Pune : ‘कॉसमॉस’ सायबर हल्ला प्रकरणातील चार आरोपींचे चेन्नईमधील सिटी युनियन बँक हल्ल्याशी कनेक्शन

एमपीसी न्यूज – चेन्नईमधील डिसेंबर 2017 मध्ये सिटी युनियन बँकेवरील झालेल्या सायबर हल्ल्यात कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यातील चार आरोपींनी समावेश असल्याचे कबूल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2017 मध्ये चेन्नईमधील सिटी युनियन बँकेचा सर्व्हर हॅक करून तब्बल 33 कोटींपेक्षा जास्त रक्कम लुटल्याचा प्रकार घडला होता. पुण्यातील नुकत्याच झालेल्या कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यातील 94 कोटी लुटणा-या आरोपींचा चेन्नईतील सिटी युनियन बॅंक सायबर हल्ल्यात समावेश असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्यातील आरोपींचा विशेष तपास पथकाकडून करण्यात आलेल्या तपासात मुंबई, औरंगाबाद, नांदेड येथून सात जणांना अटक केली होती. अटक केलेल्या शेख महंमद, फहीम खान, ॲन्थोनी ऑगस्टीन व नरेश महाराणा या चौघांनी चेन्नईतील सिटी युनियन बॅंकेवरील सायबर हल्ल्यात सहभाग असल्याची कबूल केले आहे.

सिटी युनियन बॅंक हल्ल्यातील आरोपींचा आत्तापर्यंत शोध लागला नव्हता. कॉसमॉस प्रकरणातील आरोपींकडे केलेल्या खोल तपासात चेन्नईतील सिटी युनियच्या हल्ल्यातील काही महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून कॉसमॉस बँकेच्या हल्ल्यात आणखी चार ते पाचजण समाविष्ट आहेत व त्यांचा शोध घेण्यात येत आहे असे सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांनी मंगळवारी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.