Pune : पुणे शहराचा पाणी पुरवठा दर गुरुवारी बंद राहणार; महापालिकेचा निर्णय

18 मे पासून होणार निर्णयाची अमलबजावणी

एमपीसी न्यूज :  पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रातील पाणीसाठा लक्षात घेता. प्रत्येक गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.(Pune) त्या निर्णयाची अमलबजावणी 18 मे पासून केली जाणार आहे.अशी माहिती पुणे महापालिकेचे पाणी पुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

यावेळी अनिरुद्ध पावसकर म्हणाले की,यंदाच्या वर्षी हवामान विभागाने पाऊस कमी प्रमाणात होणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव,पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात मागील वर्षी 9.20 टीएमसी इतका पाणीसाठा होता. तर सध्य स्थितीला 9.70 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.पुण्याला किमान पाच ते सहा दिवस पुरेल इतकं पाणी वाचवण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.

ASPIRE CUP 2023 – सांगवी एफ.सी., नॉईझी बॉईजचा सहज विजय

यंदा पाऊस भरपूर प्रमाणात पडला तर पाण्याचा प्रश्न मिटेल मात्र पावसाचं प्रमाण कमी झालं तर भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे आगामी काही दिवसाच पाणी नियोजन करण्याच्या दृष्टीने जून महिना अखेरपर्यंत प्रत्येक गुरुवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची अमलबजावणी 18 मे पासून केली जाणार आहे. या निर्णयामुळे चांगल्या प्रकारे पाण्याची बचत होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले..

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.