Pune : ‘नृत्य संध्या’ ओडिसी नृत्य कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज- भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ नृत्य संध्या’ या ओडिसी नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

आकांक्षा ओडिसी नृत्यालयच्या संस्था​पिका रसिका गुमास्ते, त्यांच्या शिष्या आणि शुभदा ​वराडकर यांच्या शिष्या शमा अधिकारी यानी हा कार्यक्रम सादर केला. यात ऋतुजा पवळे, अलिशा शिरोळे, गौरी शुक्ल, मुग्धा कुलकर्णी, पूजा काळे यांचा समावेश होता.

मंगलाचरण, पल्लवी ​,उडिया अभिनय ​इत्यादी मोहक नृत्यप्रकार सादर करण्यात आले.संत ज्ञानेश्वर यांच्या ‘घणू वाजे घुन घुणा ‘ या विराणीवर आधारित ओडिसी नृत्य सादर करण्यात आले .​अनेक मराठी गीतेही ​ओडिसी नृत्यावर सादर करण्यात आली. उडिया अभिनय​ रसिका गुमास्ते यांनी सादर केला. ​

वसंत बापट यांच्या ‘नदी’​ ​या काव्यावर आधारित नृत्य सादर केले. तसेच ‘गीत गोविंद’ ​मधील अष्टपदी शमा अधिकारी यांनी सादर के​ली. हरीये गती, मोक्ष हे ​प्रकारही सादर करण्यात आले. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले .मुख्याध्यापक रत्ना साहा यांनी कलाकारांचे स्वागत केले. ​​प्रमद्ववारा कित्तूर यांनी निवेदन केले. भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा 64 वा कार्यक्रम होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.