Pune : भूगोल फाउंडेशनच्या वतीने गिरिजात्मक लेण्याद्रीवर स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज – पुणे येथील भूगोल फाउंडेशन, इतर समाजसेवी संस्था आणि जुन्नर तालुका मित्र मंडळ, पुणे यांच्या सहकार्याने नुकतेच अष्टविनायकामधील गिरिजात्मक लेण्याद्री येथे साफसफाई स्वच्छता मोहीम राबवली. ‘लोकसहभागातून भूस्ंवर्धनाकडे’ या भूगोल फाउंडेशनच्या ब्रीदवाक्यानुसार तीर्थक्षेत्रे रक्षणासह ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धन आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी ही मोहीम राबविली. यासाठी प्लॅस्टिकसह कचरामुक्त लेण्याद्री , वाढते प्रदूषण आणि त्यामुळे बिघडणारा पर्यावरणाचा समतोल याविषयी जनजागृती, प्रबोधन पत्रकांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी पायथ्यापासून मंदिरापर्यंत दहा पोती प्लॅस्टिक, कचरा गोळा करून देवस्थान ट्रस्टकडे जमा केला. तसेच भाविकांना परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापन समितीने कै्ातुक केले. प्लॅस्टिक बंदीविषयी व्यवस्थापन समितीला विनंतीवजा सूचना करण्यात आल्या. गणपती दर्शननंतर लेण्याद्रीचे ऎतिहासिक व पै्ाराणिक महत्त्व दीपक सोनवणे यांनी सांगितले.

  • यानंतर वनविभाग जुन्नर, भूगोल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व जुन्नर तालुका मित्र मंडळ, पुणे यांच्या सहकार्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीत व निसर्ग सै्ांदर्याने नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील लेण्याद्री डोंगराच्या कुशीत वसलेल्या आलमे या गावातील डोंगर परिसरात वृक्षारोपणचा कार्यक्रम पार पडला.

सकाळी १० ते ५ दरम्यान पावसामध्ये विविध प्रकारच्या देशी जंगली तब्बल ३६०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाची सुरूवात वनपरिक्षेत्र अधिकारी अजय शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मा.अंकुश आमले, मा. जिल्हा परिषद सदस्य बबनराव तांबे, भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज, जुन्नर तालुका मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे यांच्या हस्ते वृक्ष लागवड व उपस्थित महिलांच्या हस्ते वृक्ष करण्यात आली. वृक्षारोपण करण्याअगोदर वनरक्षक शशिकांत मडके आणि वनरक्षक बेल्हे यांनी वृक्षारोपण कसे करावे? याचे प्रात्यक्षिक दाखविले.

  • या उपक्रमासाठी निकुंज रॆंगे,सुनील काटकर, सुनील बांगर, विठ्ठल लंघे, गणेश चै्ाधरी, झारखंडे राय, बाळासाहेब गरुड, अविनाश खोसे, मुकुंद साळुंखे, समीर कालेकर, राहुल जाधव, राहुल शिंगोटे, राजेश मोहन्तो, अवधेश यादव, निलेश छाजेड, संतोष ठाकूर, बालाजी बर्डे, सचिन घेनंद, किरण धायबर, प्रसन्ना गोडसे, विजय सुतार, संजय कुलकर्णी, अतुल नढे,सर्वेश नढे, अ‍ॅड. हर्षद नढे व असे अनेक ८० सदस्य सहभागी झाले होते.

याप्रसंगी ग्रामीण साहित्यिक लक्ष्मण वाळुंज, सायन्स पार्क पिंपरी-चिंचवडचे सुनील पोटे, नुकतीच ज्यांची IFS म्हणून निवड झाली असे विक्रम नढे, आलमे गावचे सरपंच परशुराम गोपाळे, संतनगर मित्र मंडळाचे कर्नल तानाजी अरबुज, साहेबराव गावडे, शशिकांत वाडते, चंद्रकांत थोरात, बंडु येरावार,जालिंदर शिनगारे,भागवत पाटील, अक्षय दै्ांडकर, भारती डहाके, कल्पना शिनगारे,सुनीता बिराजदार,नंदा फुगे, डॅा.स्नेहल पोटे ,संगीता खैरनार, नढे, अक्षदा शेळके, नागपूर वरून आलेल्या सै्ा शिल्पा बढे व जुन्नर तालुका मित्र मंडळाचे रोहित खर्गे, दिपक सोनवणे अनिल दुराफे,अॅड.महेश गोसावी, अण्णा मटाले,सुनील पाटे, इंद्रजित पाटोळे,आलमे गावचे द्वारकानाथ खुटले,तंटामुक्ति अध्यक्ष जालिंदर फोडसे, गोकुळ दुधसंस्थेचे चेअरमन मिनिनाथ फोडसे ,ज्ञानदेव डुंबरे व इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. भरपावसातही झाडे लावण्याचा महिलांचा, ज्येष्ठ नागरिकांचा व तरूणांचा उत्साह अवर्णनीय होता.

  • अशाप्रकारचा हा एकाच दिवशी एकाच ठिकाणी चार हजार वृक्षलागवड करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या उपक्रमापर्वी भूगोल फाउंडेशनने किल्ले शिवनेरीपासून सरुवात केली पण, जुन्नर परिसरात किल्ले चावंड,किल्ले हडसर,श्रीक्षेत्र ओझर, येथे टाक्यांच्या साफसफाई, प्लॅस्टिक कचरा, व इतर साफसफाई करून जनजागृती, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन,केले आहे.

प्रत्येक महिन्याला महाराष्ट्रातील एका किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाचे,स्वच्छता, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व जनजागृतीचे कार्य केले जाते. यासाठी पर्यावरण क्षेत्रातील उत्कृष्ट काम केल्याबद्दल ईसीए व नेल्डा या संस्थाचे पुरस्कार मिळाले. स्वच्छता जनजागृती व वृक्षारोपणा बरोबरच शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद चाळकवाडीच्या वतीने पर्यावरण व निसर्ग संवर्धनाच्या तसेच पावसाच्या कवितांचे कविसंमेलन व निसर्गरक्षणाचे मार्गदर्शन ज्येष्ठ साहित्यिक हभप एकनाथ महाराज रावळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. कवी बाबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन आणि अ‍ॅड. संतोष काशिद यांनी प्रास्तविक केले.

  • यावेळी कवी प्रा. जयसिंग वाडेकर, कवी दीपक सोनवणे यांनी पावसावरच्या कविता, कवयित्री सुनीता बिराजदार यांनी पर्यावरणसंवर्धनावरील कविता तर कवी बाबासाहेब जाधव यांनी “राजे तुमच्याच राज्यात” हि सद्यस्थिती वरील कविता सादर केली.आलमे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच परशुराम गोपाळे यांनी भूगोल फाउंडेशनचे श्री विठ्ठल(नाना) वाळुंज, जुन्नर तालुका मित्रमंडळाचे प्रभाकर ढोमसे तसेच शिवांजली साहित्यपीठाचे आभार मानले. यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

गिरिजात्मक लेण्याद्री येथे देवस्थान ट्रस्टला आवाहन करण्यात आले की, पर्यावरण, प्रदूषण, स्वच्छता याविषयी जास्तीतजास्त फलक लावून भाविकांना प्रबोधन करावे. मंदिर व मंदिर परिसरात प्लॅस्टिकला बंदी घालावी. तसेच जुन्नरवासीयांना आवाहन केले की झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवाल तरच आपण वाचणार म्हणूनच वृक्षलागवडीसाठी, निसर्ग वाढीसाठी मदत करा. कारण, आम्हास फक्त जगायचच नाही तर सर्वांना जागवायचं आहे.
– विठ्ठल(नाना) वाळुंज, ज्येष्ठ मार्गदर्शक, भूगोल फाउंडेशन.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.