Pune : ‘एम्पॉवरिंग बिझनेस थ्रू इनोव्हेशन्स अँड टेक्नॉलॉजी ‘ विषयावर चर्चासत्र

एमपीसी न्यूज- ‘पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रुनरशिप’च्या वतीने ‘ एम्पॉवरिंग बिझनेस थ्रू इनोव्हेशन्स अँड टेक्नॉलॉजी ‘ या विषयावर नुकतेच चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

पुणे कॅम्प येथे झालेल्या या चर्चासत्रात व्यवस्थापनशास्त्र ,शिक्षण,तंत्रज्ञान ,संशोधन ,उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला . इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ . शकील अहमद ,संयोजक पायल सम्दरीया यांनी स्वागत केले .

दिलशाद अहमद खान ,डॉ मल्लिका मिस्त्री ,शोएब पटेल ,बिलाल लोन ,झुल्फिकार शेख ,फहीम कोल्हार ,मयूर जगताप ,जी के पिल्ले ,डॉ तहेमीना पठाण या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले . माहितीपुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले . पुण्यातील अनेक महाविद्यालयातील संशोधकांनी प्रबंध सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.