Pune News : पुण्यात गारठा वाढला, पुणेकरांसाठी डिसेंबर महिना थंडीचा

एमपीसी न्यूज : आठवड्याभरापुर्वीच गायब झालेली थंडी आता जोमाने परतली आहे.शिवाजीनगर परिसरात रात्रीचे तापमान बुधवारी 14.3 अंशांवरून शुक्रवारी 11.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकर दिवसा ऊन आणि रात्री गुलाबी थंडी अनुभवत आहेत.(Pune News) 4 डिसेंबरपर्यंत रात्रीचे तापमान 12 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितलं आहे. आठवडाभर तरी शहरात कडाक्याची थंडी कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

शुक्रवारी पाषाण येथे रात्रीचे तापमान 11 अंश सेल्सिअस, चिंचवड येथे 16.7 अंश सेल्सिअस, लवळे येथे 17.5 अंश सेल्सिअस, मगरपट्टा येथे 17.4 अंश सेल्सिअस होते. तर शुक्रवारी शहरात दिवसाचे तापमान 31.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले म्हणजे नेहमीपेक्षा 1.9 अंश सेल्सिअस जास्त आणि रात्रीचे तापमान शुक्रवारी सामान्यपेक्षा 1.5 अंश सेल्सिअस थंड होते. परिणामी, पहाटे आणि सकाळीही बोचरे वारे वाहात होते. शिवाजीनगर, पाषाण आदी परिसरात कडाक्याची थंडी पडत असून, लोहगाव, चिंचवड आणि मगरपट्ट्यात तुलनेने कमी कडाका जाणवत आहे. पुढील तीन दिवस तरी आकाश मुख्यतः निरभ्र राहील तर  पहाटे आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी कायम राहणार आहे.

दिवसाचे तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शहरात थंड हवामान असेल. (Pune News) या वेळी रात्रीचे तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस असू शकते. दुपारी भरपूर ऊन आणि रात्री थंड वातावरण असणार आहे, असं  पुण्याच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुणेकरांना ऊन आणि थंडी दोन्ही अनुभवायला मिळत आहे. पुन्हा थंडीची चाहूल लागल्याने अनेक परिसरात रात्री शेकोट्या केलेल्या दिसत आहेत. हवेतील गारठा वाढल्याने शहरात रात्री लवकरच शुकशुकाट व्हायला सुरुवात होत आहे.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे इनरव्हील क्लबचे कौतुक

राज्यभरात थंडी

शुक्रवारी मुंबईतील सांताक्रूझमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाल तापमान 34.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते तर औरंगाबादमध्ये राज्यातील सर्वात कमी किमान तापमान 10.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार डिसेंबरमध्ये राज्यातील बहुतांश भागात रात्री थंड राहण्याची शक्यता आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा उत्तरेकडे बर्फवृष्टी होते आणि भारताच्या दक्षिणेकडील भागात थंड वारे वाहतात तेव्हा महाराष्ट्रात तापमान कमी होते, असंही त्यांनी सांगितलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.