Pune: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वीकारला पदभार

प्रभारी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्‍याकडून त्‍यांनी पदभार स्‍वीकारला. : Collector Dr. Rajesh Deshmukh accepted the post

एमपीसी न्यूज – पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज (बुधवारी) जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.

प्रभारी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्‍याकडून त्‍यांनी पदभार स्‍वीकारला.

यावेळी निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

17 ऑगस्ट रोजी डॉ. देशमुख यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी आज जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णवाढ रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्यासमोर असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.