Pune : तळवडे एमआयडीसीत जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून विचारपूस

एमपीसी न्यूज – तळवडे एमआयडीसी येथील कारखान्यात (Pune) झालेल्या आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून सर्वोपचार रुग्णालय येथे भेट घेऊन विचारपुस केली. सर्व रुग्णांवर आवश्यक उपचार तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सुजित दिव्हारे, डॉ. हरीश टाटीया आदी उपस्थित होते.

Pune : ‘पुणे पुस्तक महोत्सवा’त होणार चार विश्वविक्रम – राजेश पांडे

ससून रुग्णालयात शिल्पा राठोड (वय 31), प्रतिक्षा तोरणे (वय 16), अपेक्षा तोरणे (वय 26), कविता राठोड (वय 45), रेणुका ताथोड, (वय 20), शरद सुतार (वय 45), कोमल चौरे (वय 25), सुमन (वय 40), उषा पाडवे (वय 40) आणि प्रियंका यादव (वय 32) असे 10 रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत. (Pune)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.