Pune : नवमतदारांना मतदान प्रक्रियेत आणण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या महाविद्यालयांचा होणार गौरव
उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – अधिकारी कार्यालयातर्फे ‘उत्कृष्ट मतदार मित्र महाविद्यामहाविद्यालयीन विद्यार्थ्यांची (Pune) मतदार नोंदणी, मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महाविद्यालयांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूकलय पुरस्कार’ देण्यात येणार असून यामध्ये महाविद्यालयांना भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुण मतदाराला देशाच्या, राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी त्याची मतदार यादीत नोंद आवश्यक आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी यांनी यासाठी सहकार्य केल्यास राज्यातील अठरा वर्षांवरील सर्व तरुण पिढीला निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे शक्य होईल.
सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मतदार यादीत आगाऊ नोंदणी करण्याची संधी आहे. या कामात महाविद्यालये चांगल्याप्रकारे भूमिका बजाऊ शकतात.
Talegaon Dabhade : चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा
या पुरस्कार योजनेत भाग घेण्यासाठी गुगल अर्जाचा दुवा https://forms.gle/62YsA6SA3ngZn4UaA वर १५ डिसेंबर २०२३ पर्यंत आवश्यक माहिती भरावयाची आहे. यामध्ये महाविद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या, 1 जानेवारी 2024 रोजी महाविद्यालयातील 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, मतदार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, मतदार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी, मतदार (Pune) जागृतीसाठी महाविद्यालयाने राबवलेले उपक्रम तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरांतर्गत मतदार जागृतीसाठी राबवलेले उपक्रम याची माहिती भरावयाची आहे.
महाविद्यालयांनी जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाचे सहकार्य घेऊन मतदार नोंदणीची शिबिरे राबवावीत किंवा वोटर हेल्पलाईन या मोबाइल अॅपवरून अथवा वोटर सर्व्हिस पोर्टल वरून विद्यार्थ्याची ऑनलाइन: मतदार नोंदणी करून घ्यावी.
या पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी 2024 रोजी केले जाणार आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्राच्या सहा महसूल विभागांतर्गत सहा महाविद्यालयाची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी [email protected] या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo या संकेतस्थळावर डाऊनलोड्स- स्वीप सर्क्युलर या दुव्याखाली परिपत्रक उपलब्ध करुन देण्यात आले (Pune) आहे.