Pune : शहर भिकारीमुक्तसाठी पालिका आणि पोलिस प्रशासनाची संयुक्तपणे कारवाई

एमपीसी न्यूज – भिकारीमुक्त शहर करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी पदपथांवरील 4 झोपड्या हटविण्यात आल्या असून 4 भिक्षेकर्‍यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली आहे.

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या पुणे शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात भिक्षेकर्‍यांची संख्या वाढलेली आहे. शहरातील रस्त्यांवर, चौकांमध्ये उभे असलेले भिक्षेकरी हे चित्र चांगले नसल्याने मागील वर्षी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेेंडे यांनी पुढाकार घेऊन पालिका प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी यांची यांची बैठक घेतली होती.

  • या बैठकीमध्ये संयुक्त कारवाई करून शहर भिकारीमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शहरातील पदपथांवर राहणार्‍या आणि चौकांमध्ये थांबून सिग्नलवर वहानचालकांना व नागरिकांना पैसे मागणार्‍यांवर कारवाई केली जाते. ही कारवाई वारंवार करूनही भिक्षेकर्‍यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.