Pune : महापालिकेच्या विकासकामांना मुदतवाढ मिळणार, आयुक्तांचे संकेत

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांच्या विकासनिधीतून चालू असणाऱ्या विकासकामांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सभागृह नेते धीरज घाटे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली होती. त्याला आता यश येताना दिसून येत आहे. या विकासकामांना मुदतवाढ देणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या चालू वर्षात 2 आचारसंहिता लागल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा या आचारसंहिता कालावधीत नगरसेवकांना आपापल्या प्रभागांत व पुणे शहराची विकासकामे प्रलंबित राहिली. सध्या कोरोनाचे संसर्गरोगाचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक नगरसेवकांचे प्रभागांतील विकासकामे होत नाहीत.

सध्या 144 कलम लागू केल्याने कोणत्याही विकासकामांची अंमलबजावणी करता येत नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या सन 2019 – 2020 या अंदाजपत्रकातील विकासकामांना दि. 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी धीरज घाटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.