Pune : ‘कंपन्यांनो, आता तरी जागे व्हा, नाहीतर काळ कधी तुम्हाला माफ नाही करणार’

Pune: Companies, wake up now, otherwise time will never forgive you

1

एमपीसीन्यूज : ‌भारत सरकारने कंपन्या सुरू करण्याचा आदेश दिला आहे, त्याप्रमाणे कंपन्या सुरूही झालेल्या झालेल्या आहेत. मात्र, या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले आहे का, हा खरा प्रश्न आहे. दोन महिने कंपन्या बंद होत्या, तेथे धूळ जमा झाली असेल याचा कोणी विचार केला आहे का? हजारो कामगार तिथे काम करणार आहेत या दृष्टीने काही पावले उचलली गेली आहेत का, हा खरा प्रश्न आहे.

काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांशी बोलल्यावर असं लक्षात आलं लक्षात आलं, की पुरेशी स्वच्छता न करताच त्वरित कंपन्या उघडण्याचा निर्णय झालाय, जे की धोकादायक आहे, आदेश आल्यानंतर एक-दोन दिवसांनी जर कंपन्या उघडल्या असत्या आणि त्याची रीतसर साफसफाई जर जर झाली असती तर अधिक फायदा झाला असता.

निदान कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याआधी आपल्या तब्येतीची काळजी तर वाटली निश्चितच नसती. आता काय झालंय, की प्रत्येक जण याच काळजीत आहे, ती कामावर गेल्यावर तर मला काही होणार नाही ना. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या कंपन्यांचे एच आर आहेत त्यांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज आहे. त्यांच्यावर ती जबाबदारी आहे. हेच जबाबदारीचं भान ओळखून कोरोनाच्या या संकटातून वाचण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या गेल्याच पाहिजेत, यासाठी आपणच दक्ष राहिले पाहिजे.

एका जरी कर्मचाऱ्याला आपल्या हलगर्जीपणामुळे काही झाले, तरी आपल्या चुकीमुळे हजारो कर्मचाऱ्यांना याचा फटका बसू शकतो आणि पर्यायाने कंपनीलाही याचे नुकसान होऊ शकते. ही वेळ गाफील राहण्याची नाही नाही तर काहीतरी करण्याची आहे. घाई न करता शांतपणे सुरळीत करण्याची ही वेळ आहे.

शांतपणा आणि संयम ही काळाची गरज आहे एवढंच यानिमित्ताने लिहावसं वाटतं. ‌ ह्या गोष्टीचा संबंधित कर्मचाऱ्यांनी आणि कंपन्यांनी विचार करावा कारण कर्मचारी जगला तरच कंपनी जगेल आणि प्रगती करेल इतकंच.

लेखक : हर्षल आल्पे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like