Pune : मानवाधिकार दिनानिमित्त 8 डिसेंबरला वक्तृत्व स्पर्धा

एमपीसी न्यूज – मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने मानवाधिकार दिनानिमित्त ‘मानवी हक्क संरक्षण व संवर्धन’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 8 डिसेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये मानवी हक्कांची संकल्पनात्याचे कायदेशीर स्वरुप याची माहिती व जनजागृती व्हावी या स्पर्धेचा उद्देश आहे.

ही स्पर्धा कै. उध्दवराव तुळशीराम जाधन संचलित प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल कँम्पस नं. 1 मानाजी नगर धायरी पुणे या ठिकाणी रविवारी, दि 8 डिसेंबरला सकाळी 11वाजता होणार आहे. या स्पर्धेचा निकाल व पारितोषिक प्रदान सभारंभ 10 डिसेंबरला मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. हा समारंभ टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स मधील पदमजी सभागृहात होणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विकास कुचेकर  7276734190 आणि आण्णा जोगदंड 9359201295 यांच्याशी संपर्क करावा. या वक्तृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे विकास कुचेकर यांनी आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.