Pune : नितीन गडकरी यांच्या एका गाडीचे बनावट ‘पीयूसी’ दिल्याप्रकरणी पीयूसी केंद्र चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या एका गाडीचे बनावट ‘पीयूसी’ दिल्याप्रकरणी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संगमेश्वर पीयूसी सेंटर या पीयूसी केंद्र चालकाच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यंतरी केंद्रीय मंत्री मंत्री नितीन गडकरी यांच्या एका गाडीचे बनावट ‘पीयूसी’ दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पुण्यातील दोन पीयूसी केंद्रांनी आणि नागपूर, चंद्रपूर येथील केंद्रावर ही बनावट पीयूसी काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. जंगली महाराज रस्त्यावर साई सर्व्हिस येथील पेट्रोल पंपाजवळ संगमेश्वर पीयूसी सेंटरमध्ये एका अनोळखी वाहनचालकाने ‘एमएच-49, एई-2700’ हा वाहन नोंदणी क्रमांक सांगून ‘पीयूसी’ प्रमाणपत्र घेतले. त्यापैकी एक प्रमाणपत्र 14 सप्टेंबर ते 13 मार्च 2020 आणि दुसरे प्रमाणपत्र 13 मार्च 2020 ते १२ सप्टेंबर 2020 या कालावधीचे आहेत.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतरया प्रकरणी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी जंगली महाराज रस्त्यावरील संगमेश्वर पीयूसी सेंटर या पीयूसी केंद्र चालकाच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याचप्रमाणे आरटीओ अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून संबंधित पीयूसी चालकाची मान्यता रद्द केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.