Pune : शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार करणाऱ्या मौलवीला अटक

एमपीसी न्यूज- शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने मुंबईतील एका तरुणीला पुण्यात आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका मौलवीला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

युनूस हासिम शेख (वय-50, रा. पर्वती, पुणे) असे अटक केलेल्या या मौलवींचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही 19 वर्षाची असून सीएचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आली होती. आरोपी मौलवी याचे पीडित तरुणीच्या कुटुंबियांशी ओळख होती. या ओळखीचा फायदा घेऊन पीडित मुलीला शिकविण्याचे आमिष दाखवून युनूस शेख याने तिला मुंबईहून पुण्यात आणले. तिच्याकडून तिची मूळ शैक्षणिक कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात ठेवून ती नष्ट करण्याची धमकी देऊन तिच्यावर पर्वती येथील राहत्या घरात तसेच मुंबईत लैंगिक अत्याचार केला. तसेच तिच्या आई-वडिलांचे बरेवाईट करण्याचीही धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. दत्तवाडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like