Pune : भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयावर कार्यशाळा

एमपीसी न्यूज- भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता),इंटरनेट ऑन थिंग्स ‘ विषयावर ३ दिवसीय कार्यशाळा ‘ग्लोबल अकॅडेमिक इंटर्नशिप प्रोग्रॅम ‘ च्या सहकार्याने नुकतीच धनकवडी कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आली होती . गुरुकुल अध्यक्ष राजेश गोपाल, मंजुनाथ रोडगी आणि मोझिला कॅम्पस क्लबचे सदस्य आदर्श कुमार यांनी मार्गदर्शन केले .

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे १२० विद्यार्थी सहभागी झाले. ‘कोट्यवधी उपकरणे जगभरात इंटरनेटद्वारे जोडली जात असून त्यामुळे प्रचंड मोठी बाजारपेठ निर्माण होत आहे. उत्पादन वाढविण्यासाठी उद्योगजगत त्याचा उपयोग करीत आहे. ‘स्मार्ट फॅक्टरी ‘ उदयास येत आहेत. अशावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ‘इंटरनेट ऑन थिंग्स ‘या अत्याधुनिक संकल्पनांचा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास केला पाहिजे’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी उदघाटन सत्रात केले.

राजेश गोपाल मंजुनाथ रोडगी यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन दोन्ही संकल्पनांचे विवेचन केले. ‘तंत्रज्ञानाचा वेग वाढत असताना विद्यार्थ्यांनी नव्या ज्ञानाने स्वतःला अद्ययावत ठेवावे’, असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.