Pune : दुकाने चालू होण्याबाबत शहरात गोंधळाचे वातावरण

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने काही दुकाने आजपासून सुरू करा, असे निर्देश दिले. त्यानंतर शहरात दुकाने चालू होण्याबाबत गोंधळाचे वातावरण राहिले. दरम्यान, शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे हॉटस्पॉट आहे. शहरात फक्त दूध, भाजीपाला औषधे आणिधान्य याची सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत उघडी राहातात. या व्यतिरिक्त मध्यवस्तीत अन्य दुकाने चालू होण्याची शक्यता नव्हती. मात्र, कोथरुड, औंध, बाणेर या उपनगरात साथीचा प्रादुर्भाव नसल्याने दुकाने चालू होतील का ?याची विचारणा नागरिकांनी पोलीस , नगरसेवक आणि दुकानदारांकडे केली.

दरम्यान, रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा हवाला देवून पुण्यात दुकाने उघडली जाणार नाहीत, असे निवेदन सोशल मिडियाद्वारे केले. राज्य सरकार आणि पोलीस खात्याकडून स्पष्ट सूचना आल्याशिवाय दुकाने उघडली जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. तरीही दिवसभर गोंधळाचे वातावरण होते.

पुण्यात नवे रुग्ण दाखल होत असल्याने ३ मेनंतरही टाळेबंदीची मुदत वाढविली जाईल, अशी शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.