Pune : देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा फ्लेक्स झळकणार का ?

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली तरी पुण्यात अभिनंदनाचा फ्लेक्स लावण्याची रिस्क कुणीही घ्यायला तयार नाही. उद्या, बुधवारी होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये नक्की काय घडणार याची भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे.

पुणे महापालिकेत भाजपचे 99 नगरसेवक, सहा आमदार, तीन खासदार आहेत. पण मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा फ्लेक्स पुण्यात अद्याप झळकलेले नाही बुधवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नेमकी कोणाची सत्ता येणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काँगेस – राष्ट्रवादी – महाशिव आघाडीकडे 162 आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर, आमच्याकडे बहुमत असल्याचा प्रतिदावा भाजपचा आहे.

तडकाफडकी निर्णय घेऊन अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अजित पवार यांचा गट त्यांच्या सोबत जाणार की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साथ देणार, याची उत्सुकता लागली आहे. मागील महिनाभरापासून राज्यातील राजकारणात क्षणाक्षणाला उतकंठा वाढत आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे काँग्रेस – राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. तर, शरद पवार यांच्यापासून दूर गेलेल्या अजित पवार यांची समजूत घालण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये कोणता निर्णय लागेल त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागणार की नाही ते समजेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.