Pune: पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन

Pune: Congress agitates against petrol-diesel price hike केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलची भरमसाठ दरवाढ करून सर्व सामन्याचे कंबरडे मोडत आहे.

एमपीसी न्यूज- देशात रोज होत असलेल्या भरमसाठ पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात सोमवारी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवून, मास्क लावून कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर टाकलेला हा दरोडा आहे. मदत करण्याऐवजी सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

कोरोनाचे भीषण संकट असताना. प्रत्येक राज्य त्याला सामोरे जात आहे. पण, त्याच दरम्यान केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलची भरमसाठ दरवाढ करून सर्व सामन्याचे कंबरडे मोडत आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करीत असून सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी थोरात यांनी यावेळी केली.

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विविध प्रकारचे मोदी सरकार विरोधातील फलक झळकावले. ‘सस्ती दारू महेंगा तेल, अशा शब्दांत टीका करण्यात आली. शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, ऍड. अभय छाजेड, कमल व्यवहारे आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्यातील महाविकास आघाडीतील सर्व नेत्यामध्ये समन्वय असून आम्ही सर्व सामान्य नागरिक केंद्र बिंदू मानून निर्णय घेत आहोत. राज्य सरकारचे चांगल्या प्रकारे काम चालू असताना. त्यावर विरोधक सातत्याने टीका करीत आहे.

मात्र, त्यांनी एवढच लक्षात ठेवावे की, आमचे सरकार पाच वर्ष टिकणार असल्याची भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली. खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण राज्यात पेट्रोल – डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच जागेवर पाच किंवा एखाद्या कार्यक्रमास 50 हून अधिक जण नसावे, असे नियम सरकारकडून करण्यात आले आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा म्हणाले की, काँग्रेसकडून आंदोलनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना परवानगी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.