Pune : प्रियांका गांधी यांच्याशी गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसकडून निदर्शने (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश महिला पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज, मंगळवारी पुण्यात खंडुजीबाबा चौकात निदर्शने करण्यात आली.

हातात निषेधाचे फलक घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. भाजपची सत्ता असलेल्या ठिकाणी महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत त्याचबरोबर त्यांच्यावर गैरवर्तन होत असल्याचा आरोप निदर्शकांनी केला. यावेळी काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रवक्ते गोपाळ तिवारी तसेच काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.