BNR-HDR-TOP-Mobile

Pune : काँग्रेसच्या आंदोलनाला फडके हौद चौकातून सुरुवात

0

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस सोनलबेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली फडके चौकातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काँग्रेसचे पायी चालत आंदोलन सुरू झाले आहे. मुंबईत महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत असल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनुपस्थित आहेत. बहुतांश नगरसेवकांनीही आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

या आंदोलनात शहराध्यक्ष रमेश बागवे, संजय बालगुडे, माजी आमदार मोहन जोशी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलनाची सांगता होणार आहे.

नोटबंदी, जीएसटीमुळे देशात मोठी मंदी आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. छोट्या छोट्या कंपन्या बंद पडत आहेत. मोठ्या कंपन्यांही याचा फटका बसला आहे. लोकांच्या खिशातून मोदी सरकारने पैसा काढून घेतला आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. या सर्व बाबींचा विचार करून मोदी सरकार विरोधात काँगेस आक्रमक झाली आहे. या आंदोलनात ‘मोदी सरकार हाय हाय, बीजेपी सरकार हाय हाय’, अशा घोषणा देण्यात येत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.