Pune : काँग्रेसच्या नगरसेविका सुजाता शेट्टी कोरोना पॉझिटिव्ह

Congress corporator Sujata Shetty corona positive; पती सदानंद शेट्टी, सासूबाई आणि मुलाची टेस्ट निगेटिव्ह

एमपीसी न्यूज – काँग्रेसच्या नगरसेविका सुजाता शेट्टी यांना आज, बुधवारी कोरोनाची लागण झाली. तर त्यांचे पती सदानंद शेट्टी, सासूबाई आणि मुलाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

कोरोना संकट काळात सुजाता शेट्टी आणि सदानंद शेट्टी हे गोरगरीब नागरिकांसाठी काम करीत होते. लॉकडाऊनच्या काळात अन्नधान्य वाटप, प्रभागातील सार्वजनिक समस्या सोडविण्यावर त्यांचा भर होता. जास्तीत जास्त फिल्डवर जाऊन शेट्टी दाम्पत्य काम करीत होते.

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिकेतही शेट्टी दाम्पत्याची ये – जा होती. काँग्रेसच्या कार्यक्रमात सुजाता शेट्टी यांनी हजेरी लावली होती. आज त्यांना कोरोना झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत.

‘या संकट काळातही तुम्ही नागरिकांसाठी काम करीत आहात, तुम्ही लवकर बरे व्हा’, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या.

गोरगरीब नागरिकांसाठी शेट्टी यांचे सातत्याने काम सुरू आहे. प्रभागात पाण्याची, कचऱ्याची, रस्त्याची, ड्रेनेज लाईनची समस्या निर्माण झाल्यास ते स्वतः घटनास्थळी जाऊन पाठपुरावा करीत होते.

लॉकडाऊनमुळे गोरगरीब नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या काळात सातत्याने अन्नधान्य वाटप करणे, आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, यासाठी त्यांचा जोर होता.

सुजाता शेट्टी या सातत्याने सक्रीय होत्या. फिल्डवर काम करीत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्या लवकर या आजरातून बरे होतील, अशी प्रार्थना प्रभागातील नागरिक करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.