Pune: काँग्रेसने केला कोरोना योद्धांचा सन्मान

Pune: Congress honors Corona Warriors पुणे शहरातील सफाई कर्मचारी म्हणजेच कोरोना योद्धांचा सुरक्षिततेसाठी फेसशील्ड देऊन सन्मान करण्यात आला.

एमपीसी न्यूज- पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. काँग्रेस भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, ऍड. अभय छाजेड यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

प्रारंभी भारत-चीन सीमेवरील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना हे कोरोना योध्दा काम करीत आहे. त्यांच्या या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.

पुणे शहरातील सफाई कर्मचारी म्हणजेच कोरोना योद्धांचा सुरक्षिततेसाठी फेसशील्ड देऊन सन्मान करण्यात आला. महिला सफाई कर्मचारी यांना साडी आणि फेसशील्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी विठ्ठल थोरात, द. स. पोळेकर, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, सुनील घाडगे, प्रकाश पवार, रवी पाटोळे, यासीर बागवे, भगवान कडू, चेतन अग्रवाल, विजय वारभुवन, सुमित डांगी, परवेज तांबोळी, विनय ढोरे, गणेश शेलार, क्लेमेंट लाजरस, देविदास लोणकर, हुसेन शेख, सुनील बावकर, अरुण गायकवाड, सचिन सावंत, संगिता क्षीरसागर, नारायण पाटोळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.