Pune : पुण्यात आजपासून काँग्रेसतर्फे जनसंपर्क मोहीम

एमपीसी न्यूज – आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसतर्फे आजपासून (शुक्रवार) जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस आणि पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जनसंपर्क मोहीम सुरू करण्यात येणार असून, या माध्यमातून बूथ सहयोगींच्या नेमणुकीला सुरुवात होणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या वाद सुरू असला, तरी देखील ही जागा काँग्रेसच्याच पारड्यात जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, निवडणुकीच्या आखणीसाठी पक्षाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे.

या जनसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून केंद्र-राज्यातील सरकारच्या चुकीच्या निर्णयांबाबत जागृती करणे, प्रथम मतदान करणाऱ्या मतदारांसाठी पक्ष सदस्यता अभियान राबविणे, एक कोटी बूथ सहयोगी तयार करून प्रत्येक सहयोगीला 20 ते 25 घरांची जबाबदारी देणे, अशी उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.