Pune: ऑनलाइन शिक्षण देताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या विचारात घ्या- संस्कार चव्हाण

Pune: Consider the problems of students in rural areas while imparting online education says bjym leader Sanskar Chavan

एमपीसी न्यूज- शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे, शिक्षण संस्थांनी ऑनलाइन शिक्षण देताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या विचारात घ्याव्यात अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष संस्कार चव्हाण यांनी केली आहे.

संस्कार चव्हाण यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, सध्या कोरोना या महाभयंकर महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची पद्धत अवलंबली आहे.

मात्र शाळा व महाविद्यालत ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिविटी तसेच विद्युत पुरवठा यांची समस्या असल्यामुळे या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संस्कार चव्हाण पुढे म्हणतात, ऑनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय स्वागतार्हाय आहे. मात्र शिक्षण संस्थांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.