Pune : संविधानाने महिलांना  स्वाभिमानी केले – मुक्ता टिळक 

एमपीसी न्यूज – संविधानाने महिलांना अनेक अधिकार प्रदान केले आहेत त्याचबरोबर महिलांना स्वतंत्र्य अधिकार आणि संरक्षण संविधानाने निर्माण केले आहेत ,त्यामुळे संविधान महिलांपर्यंत पोहचले पाहिजे त्याचा सर्वांनी अभ्यास करून समाजात संविधानविषयी जागरूकता निर्माण होणे गरजेचे  आहे असे महापौर मुक्ता टिळक यांनी संविधान कट्टा कार्यक्रम प्रसंगी आपले मत व्यक्त केले.

संविधान जागर सप्ताह अंतर्गत संविधान कट्टा या विचार मंथनाच्या कार्यक्रमाचे उदघाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर परिसरात झाले ,यावेळी उपमहापौर डॉ. सिद्दर्थ धेंडे ,नगरसेविका सुनिता वाडेकर, माजी नागसेविका चंद्रकांता सोनकांबळे,प्रा.धर्मराज निमसरकर,प्रा. रमा सुर्यवंशी,रमणी हजारे,प्रा. विलास वाघ,बाळासाहेब जानराव माजी शिक्षण मंडळ सदस्य ,शहराध्यक्ष रिपाई अशोक कांबळे,शैलेश चव्हाण ,श्याम गायकवाड ,आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रमणी हजारे यांनी स्त्री पुरुष समानतेवर भास्य केले ,प्रत्येक क्षेत्रात स्त्रियां या अग्रेसर असून पुरुषांच्या तुलणेत कोठेही मागे नाहीत परंतु येथील हिंदू संस्कृतीने स्त्रीला अबला बनविले आहे ती पुरुष प्रधान संस्कृती रुजवू पहात आहेत तसेच केरळ येथील महिलांना अयप्पा मंदिर प्रवेश प्रकरणी कोर्टाने आदेश देऊनही  प्रवेश मिळत नसल्याबद्दल निषेध व्यक्त केला .

यावेळी उपस्थित महिलांनी  महिलांवरील अन्याय तसेच विविध प्रश्न उपस्थित करून त्यावर साधक बाधक चर्चा केली या कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक राजकीय संघटनेचे लोक मोठया संख्येने उपस्थित होते विशेष महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीची संख्या लक्षणीय होती त्यांनीही या संविधान कट्ट्यावरील चर्चेत सहभाग घेतला .हा संविधान कट्टा हा कार्यक्रम 3 दिवस चालणार असून यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.य वेळी मान्यवरांना आणि सहभागी लोकांना संविधान ग्रथाचे वाटप करण्यात आले

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  परशुराम वाडेकर यांनी केले ,सुत्रसंचलन प्रा. रमा सूर्यवंशी यांनी केले तर आभार बाळासाहेब जानराव यांनी मानले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.