Pune : आणखी 9 हजार रुग्णांसाठी कोव्हीड सेंटरची उभारणी

Construction of Covid Center for another 9,000 patients; 10 दिवसांत हे सर्व सेंटर सुरू होतील

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पुणे महापालिकेतर्फे फर्ग्युसन कॉलेजमधील हॉस्टेल, ॲग्रीकल्चर कॉलेज, पुणे विद्यापीठ, एमआयटी, हडपसरमध्ये बनकर स्कुल, लोहगाव एसआरए अशा विविध ठिकाणी आणखी 9 हजार रुग्णांसाठी कोविड सेंटर उभारण्यात येणार आहेत. साधारण 10 दिवसांत हे सर्व सेंटर सुरू होतील, अशी माहिती पुणे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी दिली.

फर्ग्युसन कॉलेजमधील हॉस्टेलमध्ये 350 बेडसचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हॉस्टेलमध्ये साफसफाई करण्यात येत आहे. यापूर्वी शहरात अनेक ठिकाणी कोव्हीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पुणे महापालिका जेवण, औषधे पुरविते.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी 10 दिवस या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या सेंटरमध्ये चांगले उपचार मिळत असल्याची भावना कोरोनातून बरे झालेले रुग्ण व्यक्त करीत आहेत.

पुणे शहरात कोरोनाचे 31 हजार 884 रुग्ण झाले आहेत. 20 हजार 334 नागरिकांनी वेळीच उपचार घेत कोरोनावर मात केली आहे. शहरात 10 हजार 644 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर, 906 नागरिकांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना झाला म्हणून काहीही घाबरण्याचे कारण नाही. वेळीच उपवचार घेतले तर कोरोना बरा होऊ शकतो, हे अनेक नागरिकांनी दाखवून दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.