Pune : महापालिकेच्या मॉल्समधील फ्री पार्किंगच्या निर्णयाचा ग्राहकांना दिलासा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने मॉल चालकांना पार्किंग फी न आकारण्याबाबत दणका दिल्यानंतर पुण्यात आता काही मॉल्सनी फ्रि पार्किंग करून टाकले आहे. ब-याच प्रयत्नानंतर पुण्यात अखेर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांच्या पुढाकारातून मॉल, मल्टिप्लेक्स या ठिकाणी ग्राहकांना फ्रि पार्किंगसाठी जोर लावणयात आला होता. कायद्यात फ्री पार्किंगची तरतूद असूनही ग्राहकांकडून तासाला 30 ते 50 रूपये आकारण्यात येत होते. यापूर्वी पुणे महापालिकेने प्रयत्न करूनही मॉल्सनी प्रतिसाद दिला नव्हता.

  • शहर सुधारणा समितीने याबाबत ठराव केल्यानंतर महापालिकेच्या विधी विभागाने पार्किंगसाठी फि आकारणे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले होते. त्यानंतर 44 मॉल्स आणि इतर आस्थापनांना नोटीस देण्यात आल्या. त्यानंतरही फि आकारणे सुरूचे राहिल्याने अखेरीस बालवडकर यांनी संबंधितांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याता इशारा दिला. यानंतर मॉलवाल्यांनी आजपासून शून्य फि आकारणी सुरू केली. तशा पावत्याही सोशल मिडियात व्हायरल झाल्या.’

याबाबत बोलताना बालवडकर यांनी सांगितले की, पुणेकरांची लूट या पार्किंग शुल्कातून होत होती. काही लाख पुणेकर या मॉल्स ची वर्षाला भेटी देतात. त्यांच्या पैशाची बचत यामुळे होणार आहे. सर्व कायदेशीर प्रक्रियांचा अभ्यास करूनच हे पाऊल उचलले होते. त्याला आता यश येऊ लागले आहे. इतर मॉल्सनीही या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा, त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.