Pune: पुणे शहरात संध्याकाळपासून पावसाची रिपरिप

Pune: continues light rains in Pune since the evening

एमपीसी न्यूज – पुणे शहरात बुधवारी काही काळ जोरदारपणे आलेल्या पावसाची गुरुवारी सायंकाळी रिपरिप पाहायला मिळाली. या पावसाचा उत्साही पुणेकरांनी आनंद घेतला.

चाकरमानी रेनकोट घालून आधीच तयार होते. या पावसामुळे शहरातील आणि उपनगरांतील रस्ते निसरडे झाले होते. त्यामुळे काही ठिकाणी दुचाकी घसरून अपघात झाले. त्यामध्ये नागरिकांना मुका मार बसला. शहरातील पेठा, शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, डेक्कन, कर्वे रस्ता, पौड रस्ता, कर्वेनगर, वारजे – माळवाडी, शिवणे परिसरात सध्या पाऊस सुरू आहे. आज सकाळपासूनच कमालीचा उकाळा जाणवत होता.

सायंकाळी पाऊस झाल्याने गारवा निर्माण झाला. या आल्हाददायक वातावरणाचा पुणेकरांनी आनंद घेतला. शहरात काही ठिकाणी गरमा गरम वडापाव, भजी, उफाळलेला चहा पुणेकरांनी घेतला. आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले आहेत. सोबतीला गार वाराही आहे.

एरवी पाऊस पडल्या नंतर रात्री काही प्रमाणात पुन्हा उकाडा जाणवतो. आज मात्र कमालीचे वातावरण गारेगार झाले आहेत. जून महिन्यात सुरुवातीला काही दिवस हजेरी लावणाऱ्या पावसाने दांडी मारली होती. 2 – 3 दिवसांपासून मात्र हलकासा का होईना पाऊस होत आहे. त्यामुळे पुणेकरांनी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'876d5a120bf161d9',t:'MTcxMzUzNDUwNC45MzUwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();