BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सातत्याने सराव केल्यास खेळात यश मिळते -शाम सहानी

सेंट अँड्रयूज हायस्कुल फॉर गर्ल्स शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरुवात

एमपीसी न्यूज – खेळामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. आपण नियमितपणे व्यायाम केल्यास व आपल्याला आवडणाऱ्या खेळात सातत्याने सराव केल्यास नक्की यश मिळते. त्यासाठी आपण आनंदाने खेळा आणि मन लावून अभ्यास करा. त्यामुळे आपण निरोगी राहाल. स्वयं आत्मविश्वास निर्माण करा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर शाम सहानी यांनी केले.

पुणे कॅम्प भागातील सिनेगॉग स्ट्रीटवरील जॉन विल्सन एज्यूकेशन सोसायटीच्या सेंट अँड्रयूज हायस्कुल फॉर गर्ल्स शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर शाम सहानी यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करून करण्यात आले आहे.

यावेळी ईशस्तवन,स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत केले .शाळेच्या मुख्याध्यापिका कविता शेरे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी मत व्यक्त केले. हा क्रीडा महोत्सव 7 डिसेंबरपर्यंत असणार आहे.

यावेळी आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर शाम सहानी यांनी सांगितले कि, प्रत्येकाने आपल्या आवडत्या क्षेत्रात नाव मिळवून आपल्या देशाचे नाव उंचावले पाहिजे. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता शेरे व क्रीडाशिक्षक मेघा माहिमकर व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

यावेळी क्रीडाशिक्षक मेघा माहिमकर यांनी सांगितले कि, लंगडी, डॉजबॉल, कबड्डी, थ्रो बोल, धावणे, कॅरम, लांब उडी, रिले, खो-खो, गोळाफेक, थाळीफेक आदी खेळ या वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये होणार आहेत.

प्रास्तविक व सूत्रसंचलन अर्चना साठे यांनी केले. स्वागत व परिचय क्रीडाशिक्षक मेघा माहिमकर तर, शिल्पा यादव यांनी आभार मानले.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3