_MPC_DIR_MPU_III

Pune : कंत्राटी वीज कामगारांचा सात जुलैपासून बेमुदत ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा

Pune: Contract power workers warned of indefinite 'work stoppage' agitation from July 7 सोमवारपासून काळ्या फिती लावून काम करणार, 25 जूनला निदर्शने

एमपीसी न्यूज – कोरोना संकटाच्या काळात वीज कंपनीच्या हजारो ‘कंत्राटी’ वीज कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेला अहोरात्र अखंडीत वीज पुरवठा देण्यासाठी काम केले. सरकारकडून मात्र या कामगारांची उपेक्षा होत असल्याने ‘कंत्राटी’ वीज कामगार विविध मागण्यासाठी 15 जूनपासून आंदोलन सुरू करीत आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करीत सात जुलैपासून बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने देण्यात आला आहे.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. त्यावेळी संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहुल बोडके व कोषाध्यक्ष सागर पवार उपस्थित होते.

वीज कंपनीकडून  कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही तसेच त्यांच्या वेतनामध्ये अनधिकृतपणे कपात केली जात आहे. कोरोना पासून बचावासाठी कामगारांना सॅनिटायझर साठी मिळणारे आगाऊ एक हजार रुपये आजपर्यंत खात्यावर जमा झाले नाहीत. तसेच कोणतीही वैद्यकीय सुविधा नाही व कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण दिले जात नाही, एवढेच काय मृत व्यक्तीच्या कुटुंबांना कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही.

चार टप्प्यात होणाऱ्या या आंदोलनाची सुरूवात 15 जून (सोमवार) पासून होणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून कामगारांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत आवाज उठवला जाणार आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सरकारला दिले आहे.

असे असतील आंदोलनाचे टप्पे  

1) 15 जून (सोमवार) रोजी कामगार काळ्या फिती लावून काम करतील. कंपनीच्या सर्व स्थानिक कार्यालयातील अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने नोटीस देऊन निषेध नोंदवण्यात येणार आहे.

2)  25 जून (गुरुवार) रोजी संघटनेचे पदाधिकारी निषेधाचे बोर्ड हातात घेऊन भविष्य निर्वाह निधी ऑफिस, ESI ऑफिस, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, तहसीलदार ऑफिस , जिल्हाधिकारी कार्यालय यांना नोटीसीची प्रत देऊन तेथे निदर्शने करतील.

3) 1 जुलै (बुधवार) रोजी राज्यातील सर्व कंत्राटी कामगार हे काळ्या फिती लावून, काळे झेंडे, व निषेधाचे बोर्ड घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता कार्यालया समोर दुपारी 1 ते 2 दरम्यान एकत्र येऊन निदर्शने केली जाणार आहेत.

4) 7 जुलै (मंगळवार) रोजी राज्यातील तिन्ही कंपनीतील सर्व कंत्राटी कामगार मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत.

संलग्न भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.