Pune : रंगूनवाला दंत महाविद्यालयात शानदार पदवीदान समारंभ

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस मध्ये पदवीदान समारंभ उत्साही वातावरणात पार पडला. पदवीदान सोहळ्याचे हे चौदावे वर्ष होते.

हा कार्यक्रम गुरुवारी (दि. 22) संध्याकाळी असेंब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे झाला. युनिवर्सिटी ऑफ झुरीच (स्विझर्लंड) चे विभागप्रमुख डॉ ख्रिस्तोफ हेमरले, अबेदा इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते .

यावेळी बॅचलर ऑफ डेंटल सायन्सेस(बी डी एस)च्या 113 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. प्राचार्य डॉ रमणदीप दुग्गल, उपप्राचार्य डॉ. विवेक हेगडे, निबंधक आर ए शेख, डॉ रशमी हेगडे, डॉ अमिषा शहा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यासमवेत प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी वैद्यकीय व्यवसायात नीतिमूल्ये जपण्याची शपथ घेतली. एमडीएस परीक्षेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.