Pune : शहरात कोरोनाचे 807 नवे रुग्ण, 619 कोरोनामुक्त, 9 जणांचा मृत्यू

Corona 807 new patients in the city, 619 corona-free, 9 deaths : शहरात कोरोनाचे 807 नवे रुग्ण, 619 कोरोनामुक्त, 9 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्याने मागील 3 दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. जवळपास 800 च्या वर रुग्ण आढळून येत आहेत. आज, शुक्रवारी सुद्धा दिवसभरात 807 रुग्ण आढळून आले. तर 619 जण या रोगातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला.

शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये सध्या कोरोनाचे 389 क्रिटिकल रुग्ण असून त्यात 59 जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. शहरात आता कोरोनाचे 19 हजार 849 रुग्ण झाले आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 6 हजार 874 आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे 685 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 हजार 290 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज कोरोनाच्या तब्बल 4 हजार 250 चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

कोथरूडमधील 74 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 67 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 70 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, धायरीतील 66 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, लोहियानगरमधील 70 वर्षीय महिलेचा राव नर्सिंग होममध्ये, बोपोडीतील 65 वर्षीय पुरुषाचा D. H. औंध हॉस्पिटलमध्ये, दांडेकर पूल परिसरातील 62 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, वडगाव बुद्रुकमधील 85 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, टिंगरेनगरमधील 73 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.