Pune कोरोनाचे 832 नवे रुग्ण, 614 जणांना डिस्चार्ज, 9 जणांचा मृत्यू

Corona 832 new patients, 614 discharged, 9 dead : आतापर्यंत 18 हजार 96 नागरिकांनी कोरोनावर मात केली

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या सोमवारी सर्वाधिक 5 हजार 168 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 832 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 614 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 9 जणांचा मृत्यू झाला.

कोरोनाचे पुण्यात आता 28 हजार 357 रुग्ण झाले आहेत. यामध्ये 486 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 174 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 18 हजार 96 नागरिकांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

कोरोनामुळे आजपर्यंत 849 नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. 9 हजार 412 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

हडपसरमधील 65 वर्षीय महिलेचा, मार्केटयार्डमधील 53 वर्षीय पुरुषाचा, कोंढाव्यातील 27 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 55 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, शिवणेतील 75 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये, 62 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, हडपसरमधील 54 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, महर्षिनगरमधील 55 वर्षीय पुरुषाचा व हडपसरमधील 40 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.