Pune : महापालिका सर्वसाधारण सभेलाही कोरोनाचा फटका

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने महापालिकेची सर्वसाधारण सभा अतिशय महत्वपूर्ण आहे. मात्र, या सभेलाही आता कोरोनाचा फटका बसला आहे. एप्रिल महिन्यातील सर्वसाधारण सभेला केवळ 5 नगरसेकांनी हजेरी लावली. त्यामुळे ही सभा तहकूब करण्यात आली, असे महापालिका प्रधासनातर्फे सांगण्यात आले.

या सभेवेळी नगरसचिव उपस्थित होते. महापालिका अधिनियमानुसार उपस्थित राहून सभा तहकूब करणे आवश्यक आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. रोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाच्या टेस्ट वाढत असल्याने रुग्ण वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, या कोरोनाचा धसका नागरसेवकांनीही घेतला आहे. महापालिकेत हजेरी न लावता त्यांनीही ‘वर्क फॉर्म होम’ सुरू केले आहे. नागरिकांच्या रोजच्या अडचणी सोडविण्याचे काम सुरू असल्याचे या नगरसेवकांकडून सांगण्यात येत आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बेघर व गोरगरीब नागरिकांना अन्नदान, जेवण पुरविण्याचे काम सुरू आहे. त्याला आता महिना झाला आहे. मागील महिनाभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामुळे पुणे शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत. तसेच स्थायी समिती, सर्वसाधारण सभा आणि महापालिकेच्या इतर विषय समितीच्या बैठकांनाही कोरोनचा फटका बसला आहे.

अशा परिस्थितीत एप्रिल महिन्यातील महापालिका सर्वसाधारण सभाही तहकूब करावी लागली. कारण कोरोनाच्या धास्तीने केवळ 5 नगरसेवक या सभेला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.