Pune : ‘कोरोना’मुळे भीमसैनिकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी

एमपीसी न्यूज – यंदा अभूतपूर्व अशा ‘कोरोना’च्या संकटामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती भीम सैनिकांनी घरीच साजरी केली. ‘भीमा तुझ्या लेकराची घे वंदना’ म्हणत अभिवादन केले.

एरवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी केली जाते. यावर्षी मात्र, कोरोनाचे संकट लक्षात घेऊन भीम बांधवांनी सामाजिक उपक्रम जास्तीत जास्त राबविण्यावर भर दिला. गोरगरिबांना अन्नदान, वाचन, भीम गीते म्हणून वेगळाच संदेश दिला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच सजरी करण्याचे आवाहन केले होते. यंदा कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीला बंदी होती.

दांडेकर पूल, पुणे क्यान्टोन्मेंट, शिवाजीनगर, वारजे, येरवडा भागात भीमजयंती धुमधडाक्यात साजरी केली जाते. भलेमोठे फ्लेक्स लावण्यात येतात. जंगी कार्यक्रम होत असतात. पुणे शहरातील आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकाही लक्षवेधी असतात. यंदा मात्र, कोरोनाचा संकटामुळे भीमसैनिकांचा हिरमोड झाला.

भीम जयंतीची तयारी महिना भरपूर्वीच केली जाते. त्यासाठी कार्यकर्ते रात्रंदिवस परिश्रम करीत असतात. यंदा मात्र आंबेडकरी जनतेचा भ्रमनिरास झाला. कधी एकदाचे हे कोरोनाचे संकट जाणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.