Pune : ‘कोरोना’मुळे नागरिक रात्रीही करताहेत महापालिका अधिकाऱ्यांना फोन!; विश्रांतीही मिळत नसल्याची अधिकाऱ्यांची खंत

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. सोसायटीमध्ये विदेशवारी करून आला असेल तर नागरिक महापालिका अधिकाऱ्यांना रात्री – बेरात्री फोन करीत आहेत. त्यामुळे विश्रांतीही मिळत नसल्याची खंत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावरून कमी मनुष्यबळामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यावर ताण येत असल्याचे समजत आहे.

आधीच आमच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाला न घाबरता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पण, मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये एखाद्याला ‘कोरोना’ झालाच तर अतिशय वाईट पद्धतीने वागणूक दिली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

अशा नागरिकांवर कारवाई करणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य खात्यात आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. आहे त्या कर्मचाऱ्यांवर ‘कोरोना’मुळे प्रचंड ताण येतोय, असे सूत्रांनी सांगितले आहे.

विदेशातून आलेल्या आणि पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या 9 कोरोनाबाधित रुग्णांच्या घराच्या एक किलोमीटर अंतरातील घरांचे व तेथील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे.

आत्तापर्यंत ५७ हजार ७६९ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये ६९ नागरिकांना सौम्य सर्दी, खोकला आणि ताप असल्याचे दिसून आले. पदेशातून आलेल्या 11 जणांना ‘होम क्वारंटाईन’च्या सूचना करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.