Pune : कोरोनामुळे महापालिकेतील नगरसेवकांसह नागरिकांची वर्दळ घटली

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मागील 3 महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठयासंख्येने आढळून येत आहे. महापालिकेची सर्वच यंत्रणा 24 बाय 7 या संकटाचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर, दुसरीकडे महापालिकेत नागरिक आणि नगरसेवकांची वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे कमालीची शांतता जाणवत आहे.

यापूर्वी कधीही असे चित्र पहावयास मिळाले नसल्याचे महापालिकेत काम करणाऱ्या अनेक जुन्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांसह कोरोना प्रतिबंध नसलेल्या भागांत 12 तास दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अद्यापही काही दुकाने उघडण्यात आली नाही. जी दुकाने उघडण्यात आली आहेत, तिथे ग्राहक नसल्याचे चित्र आहे.

तर, महापालिकेच्या आजूबाजूला असलेले काही रस्तेही बंद आहेत. शिवाजीनगर गावठाणात जाणारे रस्ते बंद असल्याचे चित्र आहे. काँग्रेस भवन, महापालिकेच्या समोरील, डेक्कन परिसर, झाशीची राणी चौकातील रस्ते बंद करण्यात आले आहेत.

महापालिकेत एरव्ही नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी असते. कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवर परिणाम झाला आहे. उत्पन्नात घट झाली आहे. विकासकामे रखडली आहेत. हे संकट कधी जाणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.