Pune : ‘कोरोना’मुळे पुण्यातील रस्त्यांवर स्मशान शांतता!

चहाच्या, पानाच्या टपरीपासून, हॉटेल, किरकोळ विक्रेत्यांची दुकानेही स्वयंस्फूर्तीने बंद

एमपीसी न्यूज – जंगली महाराज रस्ता असो की फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, कर्वे रोड, आपटे रोड, अलका टॉकीज चौक, टिळक रोड, सिंहगड रोड, नगर रोड, पुणे शहरातील सर्वच रस्त्यांवर स्मशान शांतता आहे.

कोरोनाचा पुण्यात एवढा धसका घेतला आहे की, चहाच्या, पानाच्या टपरी पासून, हॉटेल, किरकोळ विक्रेत्यांनीही स्वयंस्फूर्तीने बंद पडला आहे. पुणेकर स्वतःहुनच बाहेर यायला तयार नाही. स्मशान शांतता असल्या सारखे वातावरण आहे.

‘हातावरच पोट’ असणारे अनेक चाकरमानी कोरोनाला घाबरून गावाकडे गेले आहेत. खाजगी बस वाल्यांची तर सध्या चांदीच सुरू आहे. अव्वाच्या सव्वा दराने भाडे आकारणी सुरू आहे. दुसरीकडे ‘पीएमपीएमएल’ च्या गाड्या रिकाम्या धावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कोरोनाची पुण्यात एवढी दहशत निर्माण झाली आहे की, पुणेकरांनी हातात हात देणेच सोडून दिले आहे. सर्वत्र तोंडाला रुमाल, मास्क लावून सर्वसामान्य पुणेकर दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.