Pune : कोरोनाच्या संकटात किराणासह भाजीपाल्याची विक्री चढ्या दराने विक्री

सर्वसामान्य पुणेकरांची आर्थिक लूट

एमपीसी न्यूज – सध्या पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना सर्वसामान्य पुणेकरांची आर्थिक लूट सुरू आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाला मिळणे अवघड झाले आहे, तर आहे तो भाजीपाला आणि किराणामाल चढ्या दराने विकत घेण्याची वेळ आली आहे. 

सध्या पुणे शहरात 90 रुपये किलो असणारे सोयाबीन तेल आता 120 रुपये, शेंगदाणे 100 वरून 130 रुपये किलो, कांदे 30 वरून 70 रुपये किलो, बटाटे  20 वरून 40 रुपये किलो, टोमॅटो 10 रुपये वरून 40 रुपये किलो, फ्लॉवर 40 वरून 80 रुपये किलो, पत्ता कोबी 30 रुपये वरून 60 रुपये किलो, वांगे 30 रुपये वरून 80 रुपये किलो, हिरवी मिरची 200 रुपये किलो, अद्रक आदी  सर्वच भाजीपाला महाग झाला आहे. तर, पालक, मेथी, शेपू, चवळी, कोथिंबीर, अशा पालेभाज्या मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे पुणेकरांवर  आता डाळी, कडधान्ये खरेदी करण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर करून 35 दिवसांचा कालावधी झाला आहे. या काळात पुणेकरांचे जवळचे होते नव्हते ते आता संपले आहे. आणखी लॉकडाऊन वाढल्यास जीवन जगणे कठीण होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

तूरडाळ 110 वरून 120 रुपये किलो, चना डाळ 100 रुपये वरून 120 रुपये किलो, मुंग डाळ 110 वरून 120 रुपये किलो, मसूर डाळ 70 वरून 80 रुपये किलो, उडीद डाळ 130 वरून 140 रुपये किलो, छोले 60 वरून 80 रुपये किलो दराने विकत घ्यावी लागत आहे. भाजीपाला, किरणामाल, डाळीही महाग झाल्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जगायचे कसे, असा सवाल निर्माण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.