Pune : ‘कोरोना’बधितांवर उपचार करणाऱ्या डॉकटर, कर्मचाऱ्यांचा विशेष विमा काढा -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा विशेष विमा काढावा, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

खासगी संस्थाबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात यावे. आजूबाजूला असलेल्या, परदेशातून आलेल्या आणि कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या एखाद्या प्रवाशाची माहिती सांगण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकाची व्यवस्था करावी.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने उपाययोजनांची व्याप्ती तातडीने वाढवावी, अशी आग्रही मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.