-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune : कोरोना इफेक्ट; 15 एप्रिलपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार 50 रुपयांना!

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन देखील सजग आहे. रेल्वे विभागाकडून रेल्वे गाड्यांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता तसेच आवश्यकता भासल्यास गाड्या रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यातच रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये, यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म तिकीट आता 50 रुपयांना मिळणार आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

‘कोरोना’ विषाणूशी लढण्यासाठी विविध पातळ्यांवरून प्रयत्न सुरु आहेत. पुण्यामध्ये बुधवारी आणखी एका रुग्णाची वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे शहरात एकूण 18 तर राज्यात 42 रुग्णसंख्या झाली आहे. ही संख्या वाढू नये. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे हा महत्वाचा उपाय आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्म तिकिटांमध्ये वाढ करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म तिकीट यापूर्वी 10 रुपयांना मिळत असे. मंगळवार (दि. 17) पासून प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपयांना मिळणार आहे.

प्लॅटफॉर्मच्या तिकीट दरातील वाढ 15 एप्रिल 2020 पर्यंत राहणार आहे. तसेच पुणे, मिरज, कोल्हापूर रेल्वे स्थानकांवरील विश्रामगृह बंद करण्यात आले आहे. तसेच विश्रामगृहाचे बुकिंग देखील बंद करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.