Pune: कोरोनाचा परिणाम; महापालिकेचे अनेक प्रकल्प रखडण्याची चिन्हे

Pune: Corona effect; Signs of delays in many municipal projects स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2020-21चा तब्बल 7 हजार 390 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामध्ये विविध प्रकल्प घोषित करण्यात आले.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात अभूतपूर्व असे कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नाबरोबरच विविध प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2020-21चा तब्बल 7 हजार 390 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामध्ये विविध प्रकल्प घोषित करण्यात आले.

आता केवळ 2 महिने गेले आहेत. आणखी 10 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न पूर्ण करण्याबरोबरच विविध योजनाही मार्गी लावणार असल्याचा विश्वास अध्यक्ष हेमंत रासने यांनी व्यक्त केला.

शिवाजी रस्त्यावर ग्रेडसेपरेटर, खडकवासला ते स्वारगेट सायकल ट्रॅक, बालभारती ते पौड रस्ता, वखार महामंडळ चौक येथे उड्डाणपूल, बंडगार्डन जंक्शन ते मुंढवा डीपी रोड, आंबील ओढा सुशोभिकरण, सुषमा स्वराज संवेदना पार्क, सारसबागेतील नियोजित बोटॅनिकल गार्डन्स, नळस्टॉप चौकात उड्डाणपूल असे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प कागदावरच राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तसेच, महापालिकेची चांदनी चौकातील बीडीपीच्या जागेत 50 एकरवर भव्य अशी शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, हा प्रकल्पही कागदावरच आहे.

तर, शिवसृष्टी होणारच असल्याचा विश्वास भाजपचे पदाधिकारी व्यक्त करीत आहे. हा प्रकल्प तातडीने करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.