Pune : कोरोना इफेक्ट; आयुक्त मांडणार पुरवणी अंदाजपत्रक

Corona effect; The Commissioner will present the supplementary budget

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड लवकरच पुरवणी अंदाजपक मांडणार आहेत. राज्य सरकारच्या कार्यपद्धतीनुसार हा पुरवणी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तसे संकेत यापूर्वीच आयुक्तांनी दिले होते.

अनावश्यक सुशोभीकरणाची आणि पुढील वर्षी करता येऊ शकणारी कामे टाळून जे प्रकल्प होऊ शकणार नाहीत, ते अंदाजपत्रकातून वगळण्यात येणार आहेत.

कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या जीएसटीच्या निधीमध्ये मोठी कपात झाली आहे.

बांधकाम शुल्क आणि मिळकत कराचे उत्पन्नही कमी झाले आहे. शासनाने अनावश्यक कामे न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त पुरवणी अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणार आहेत. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी मुख्यसभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2020 – 21 चे तब्बल 7 हजार 390 कोटींचे बजेट मांडले होते.

महापालिकेचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय, चांदनी चौक उड्डाणपूल, एचसीएमटीआर, जायका, शिवसृष्टी, पंतप्रधान आवास योजना, हद्दीलगतच्या गावांचा महापालिकेत समावेश, शहराच्या विविध भागांत उड्डाणपूल, बालगंधर्व पुनर्विकास, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, शिवसृष्टी,  अशा  अनेक योजनांचे स्वप्न दाखविण्यात आले होते.

कोरोनामुळे यातील सर्वच प्रकल्प सध्या कागदावर आहेत. महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने या प्रकल्पांचे काय होणार, असा प्रश्न नगरीकांना पडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like