Pune : कोरोना; पाच जणांचा मृत्यू, ९८ क्रिटिकल, ६९ जणांना डिस्चार्ज

पुणे – शहरात कोरोनाबाधित नवीन रुग्णांची दिवसभरातील संख्या ९१ असून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरात  कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या आता 149 झाली आहे.  ६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. मृतांमध्ये एका महिलेसह चार पुरुषांचा समावेश आहे.

सध्या पुण्यात ससून रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मिळून असलेल्या क्रिटिकल रग्णांची संख्या शंभरी जवळ पोहोचली असून सध्या ९८ रुग्ण क्रिटिकल आहेत. त्यातील १९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

पुण्यातील आत्तापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २,५७२ आणि अॅक्टिव्ह रुग्ण संख्या १,३३५, एकूण मृत्यू १४९ झाले आहेत. शहरात दिवसभरात १००८ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

भवानी पेठेतील 40 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, पद्मावती भागातील 63 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, भवानी पेठेतील 57 वर्षीय पुरुषाचा वायसीएम हॉस्पिटलमध्ये, येरवडा भागातील 66 वार्षीय महिलेचा भरती हॉस्पिटलमध्ये, रामवाडी भागातील 42 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील भवानी पेठ हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. या भागात सातत्याने कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढते आहेत. आजही कोरोनाचे 2 बळी या भागातीलच गेले. 4 पुरुष आणि 1 महिला अशा 5 जणांचा बळी गेला आहे. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

दिवसभरात 69 रुग्ण घरी सोडण्यात आले. 1089 रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी सोडलेले आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1335 आहे असून, रविवारी कोरोनाच्या एकूण 1008 चाचण्या घेण्यात आल्या.

तर, पुणे जिल्हयातील 2 हजार 926 बाधीत रुग्ण असून 1 हजार 139 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 630 आहे. कोरोनाबाधित एकूण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.