Pune Corona Good News: कोरोनाबाधित महिलेने दिला ‘कोरोनामुक्त’ बाळाला जन्म!

Pune Corona Good News: Corona-infected woman gives birth to 'corona-free' baby!

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या अप्रिय बातम्यांचा भडीमार होत असतानाच एक चांगली बातमी पुण्यातून आली आहे.  कोरोनाबाधित असलेल्या एका महिलेने ‘कोरोनामुक्त’ बाळाला जन्म दिला आहे. पुणे महापालिकेच्या सोनावणे रुग्णालयात संबंधित महिलेची प्रसूती करण्यात आली. बाळाची तब्बेत ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

यापूर्वी पुण्याच्या ससून रुग्णालयात 18 एप्रिलला अशाच प्रकारची घटना घडली. त्यानंतर कोरोनाबाधित महिलेने कोरोनामुक्त बाळाला जन्म देण्याची ही शहरातील दुसरी घटना आहे. 

महापालिकेचे सोनावणे रुग्णालय हे कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी खास राखून ठेवलेले रुग्णालय आहे. त्या ठिकाणी या महिलेची प्रसूती झाली. यात गरोदर महिलांची विशेष काळजी घेतली जात आहे. नवजात बाळाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून त्याला तूर्त आईपासून वेगळे ठेवण्यात आले असून रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी बाळाची विशेष काळजी घेत आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोनवणे रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका आणि राबणाऱ्या प्रत्येक घटकाला पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.