Pune : कोरोनाचे दिवसभरात 467 नवे रुग्ण; 273 रुग्णांना डिस्चार्ज, 10 जणांचा मृत्यू

Corona had 467 new patients throughout the day; Discharge of 273 patients, death of 10 persons

एमपीसी न्यूज – कोरोनाचे दिवसभरात 467 नवे रुग्ण आढळले. तर 273 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज, मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 6 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे.

सध्या शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये 277 क्रिटिकल रुग्ण असून, 57 जण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरातील 7 हजार 945 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

आतापर्यंत या कोरोनामुळे 528 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात आता कोरोनाचे 13 हजार 153 रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

कोथरूडमधील 57 वर्षीय महिलेचा आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रस्त्यावरील 84 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 65 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 60 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 50 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तसेच बिबवेवाडीतील 59 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, औंधमधील 84 वर्षीय महिलेचा AIMS हॉस्पिटलमध्ये, कोंढव्यातील 66 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 50 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, विष्णु शांती मंडळ परिसरातील 59 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. पुणे शहरात आता कोरोनाचे 13 हजारांच्यावर रुग्ण आहेत.

त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. तर, 528 नागरिकांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.