Pune : कोरोनामुळे पंतप्रधान आवास योजना, भामा – आसखेड योजनेसह अनेक प्रकल्प रखडले

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असून त्याचा फटका विकासकामांनाही बसला आहे. सर्वसामान्य पुणेकरांसाठी अतिशय महत्वपूर्ण असणारी पंतप्रधान आवास योजना, समान पाणीपुरवठा योजना, महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय, भामा – आसखेड, एचसीएमटीआर रस्ता, मुळा – मुठा नदी संवर्धन योजना अशा जवळपास 10 हजार कोटींच्या योजना रखडल्या आहेत.

या योजना पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या मात्र कोरोना एके कोरोनाच सुरू आहे. महापालिकेची सर्व यंत्रणा 24 बाय 7 या कामात व्यस्त आहे. महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय शासनाच्या अंतिम मान्यतेसाठी होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचार घेणे सोपे झाले असते.

समान पाणीपुरवठा योजनेसाठी कर्जरोखे काढण्यात आले आहे. त्याचे व्याजही भरावे लागत आहे. ही योजना मार्गी लागल्यावर पुणेकरांना केवळ 9 टीएमसीच पाणीसाठा लागणार आहे. तब्बल 9 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. दुसरीकडे पुणे मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे.

महापालिका हद्दीत एकूण 10 लाख 57 हजार 716 एवढ्या मिळकती आहेत. जुन्या हद्दीतील एकूण मिळकतीची संख्या 9 लाख 13 हजार आहे. या मिळकत धारकांकडून तब्बल 1 हजार 365. 24 कोटी मिळकत कर येणे बाकी आहे. तर, पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांत 146.51 कोटी मिळकत कर येणे बाकी आहे.

नागरिकांना रोख आणि ऑनलाइन मिळकत कर भरण्याची शहरात 25 ठिकाणी सुविधा महापालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाचा संकट काळात महापालिकेच्या तिजोरीत सध्या प्रचंड खळखळाट आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.