Pune : महापालिकेच्या 159 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

Corona hits 159 municipal employees

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या 159 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण बाधा आहे. यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच यामध्ये कायमस्वरूपी सेवक, कंत्राटी कामगारांचाही समावेश आहे. तर कोरोनामुळे 12 जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही अनेक कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून महापालिकेचे अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी काम करीत आहेत.

राज्य शासनातर्फे लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. पुणे शहरात कोरोनाचे 16 हजारांच्या पुढे रुग्ण गेले आहेत. त्यामध्ये साडे नऊ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 6 हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामध्ये 115 महापालिकेचे कायमस्वरूपी सेवक, 44 कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. 77 कर्मचाऱ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. 69 जणांवर उपचार केले जात आहेत.

महापालिका कर्मचाऱ्यांना कोरोना होऊ नये, यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कामगारांना मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायजर तर, काही कर्मचाऱ्यांना पीपीपी किट सुद्धा देण्यात आली आहेत.

मात्र, तरीही अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. गरज असेल तरच बाहेर पडावे; अन्यथा घरीच राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.