Pune : ‘कोरोना’चा ‘पीएमपीएमएल’ला फटका; अपेक्षित 2 कोटींचे उत्पन्न नाही

एमपीसी न्यूज – सध्या जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना त्याचा फटका ‘पीएमपीएमएल’ ही बसला आहे. बुधवारी (दि. 11) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, अशी माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

1800 पेक्षा जास्त बसेस पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील मार्गावर सोडण्यात आल्या. मात्र, अपेक्षित 2 कोटी रुपयांचे उत्पन्न गाठणे अवघड झाल्याचे संबंधित अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मागील 3 दिवसांपासून पुण्यात ‘कोरोना’चे रुग्ण आढळून येत आहेत. त्याचा फटका ‘पीएमपीएमएल’ही बसला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.